News18 Lokmat

मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

येत्या 48 तासात मुंबई आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातही सुरु असलेला पाऊस कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2017 10:45 AM IST

मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

29 आॉगस्ट: मुंबईसह राज्यात सध्या कोसळत असलेला पाऊस पुढचे काही दिवस असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. येत्या 48 तासात मुंबई आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातही सुरु असलेला पाऊस कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

गेल्या 4 दिवसापासून कोकणाला पावसाने झोडपले आहे. रायगड जिल्ह्यात 3 दिवसापासून पाऊस कोसळतोय. त्यामुळे सावित्री, कुंडलिका आणि आंबा या नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. जिल्हा आपत्कालीन कार्य कक्षाने पुढील 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. रोह्याच्या कुंडलिका नदीनेही गेल्या 3 दिवसांत 2 वेळा धोक्याची पातळी ओलांडली आहे. अलिबाग, पेण, महाड, माणगावं, पोलादपूर या तालुक्यांना पावसाने झोडपून काढलंय. ऐन सणासुदीच्या काळात बाप्पाच्या आगमनापासून पावसाने या आनंदाच्या उत्सवात सगळ्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे

तर पालघरमध्ये रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. सुर्या नदीवरील धामणी धरणाचे पाचही दरवाजे दीड फुटाने उघण्यात आले असून 9000 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सूरु आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळं फक्त 40 टक्के भरलेल्या धरणांमध्ये आता 80 टक्के पाणीसाठा झालाय. आणि राधानगरी धरणातून अजूनही पाण्याचा विसर्ग सुरु असल्यानं 9 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राजाराम बंधाराही पाण्याखाली गेला आहे. दरम्यान राज्यातील धरणांमध्ये आता 66.40 टक्के उपयुक्त साठा जमा झाल्याची माहिती जलसंपदा विभागाने जाहीर केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 29, 2017 09:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...