मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता-हवामान खाते

येत्या 24 तासात कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2017 08:59 AM IST

मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता-हवामान खाते

मुंबई, 18सप्टेंबर: मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या 24 तासात कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई ,पालघर रायगड जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

दरम्यान राज्यातील बऱ्यापैकी धरणं भरत आली असून या पावसामुळे शेतकऱ्यांना अजून थोडा दिलासा मिळू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2017 08:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...