पुण्यात IT इंजिनिअरची आत्महत्या, समोर आलं हे कारण..

पुण्यात IT इंजिनिअरची आत्महत्या, समोर आलं हे कारण..

रोहित बापुराव पाटील (28) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. हिंजवडी परिसरातील एका आयटी कंपनीत तो नोकरी करत होता. रोहित हा त्याच्या भावासह वाकडमधील रॉयल आर ग्रीन सोसायटीत राहत होता.

  • Share this:

पुणे, 18 एप्रिल- एका आयटी इंजिनिअरने 12 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. वाकड परिसरात गुरूवारी दुपारी 12  च्या सुमारास ही घडली. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

रोहित बापुराव पाटील (28) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. हिंजवडी परिसरातील एका आयटी कंपनीत तो नोकरी करत होता. रोहित हा त्याच्या भावासह वाकडमधील रॉयल आर ग्रीन सोसायटीत राहत होता. भाऊ कंपनीत गेल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचललं. दुपारी 12 च्या सुमारास रोहितने 12 व्या मजल्यावरुन उडी मारून जीवन संपवलं.

आजारपणाला कंटाळुन केली आत्महत्या

रोहितच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. परंतु रोहित यानं आजारपणाला कंटाळुन आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.


मतदानानंतर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 04:04 PM IST

ताज्या बातम्या