अमित शहा गडकरींवर नाराज आहेत का?

गडकरींचा वाढदिवस भव्यदिव्य साजरा करण्यावर भाजपचे दिल्लीतले नेते नाराज होते का या चर्चेलाही नव्याने तोंड फुटलंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 29, 2017 02:46 PM IST

अमित शहा गडकरींवर नाराज आहेत का?

29 मे : नितीन गडकरींच्या वाढदिवसाला दांडी मारणारे अमित शहा आज संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आवर्जून नागपुरात आलेत. नागपुरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचं आयोजन करण्यात आलंय. त्यात सहभागी होण्यासाठी आवर्जून नागपुरात आलेत. त्यांनी सरसंघचालक मोहन भागवतांची भेटही घेतलीय.त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय. गडकरींचा वाढदिवस भव्यदिव्य साजरा करण्यावर भाजपचे दिल्लीतले नेते नाराज होते का या चर्चेलाही नव्याने तोंड फुटलंय.

दरम्यान, असंही कळतंय गडकरींच्या वाढदिवसाचं आमंत्रण आल्यावर अमित शहा यांनी आपल्याला येणं शक्य होणार नाही, असं सांगितलं होतं. मोदी सरकारला तीन वर्ष झाल्यामुळे शनिवार-रविवार आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांना हजर राहायचं होतं.

सध्या भाजपमध्ये राष्ट्रपतीपदासंदर्भात अनेक बैठका सुरू आहेत. त्यासंदर्भातच ते मोहन भागवत यांना भेटायला नागपुरात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 29, 2017 02:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...