Elec-widget

इराणी तरुणीला सिगारेटचे चटके आणि मारहाण, उद्योगपतीच्या मुलाला अटक

इराणी तरुणीला सिगारेटचे चटके आणि मारहाण, उद्योगपतीच्या मुलाला अटक

पोलिसांनी धनराजच्या घराची झडती घेतली आणि परवीनची सुटका केली.

  • Share this:

पुणे 25 डिसेंबर : शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या इराणच्या एका तरुणीला प्रेमात फसवून तिचा छळ करणाऱ्या उद्योगपतीच्या मुलाला पोलिसांनी अटक केलीय. त्या नराधमाने तिला महिनाभर एका खोलीत कोंडून ठेवून छळ केल्याची धक्कादायक माहिती या तरूणीने दिली आहे.


परवीन घिलची ही इराणची तरुणी वर्षभरापूर्वी  सॉफ्टवेअर इंजिनियरिंगच्या शिक्षणासाठी पुण्यात आली होती. तिच्या मैत्रिणीने तिची ओळख धनराज मोरारजी याच्यासोबत करून दिली. ओळखची रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.


परवीनलाही पुण्यात आधार हवा होता. तिची ही गरज ओळखून धनराज तिला आधार देऊ लागला. नंतर परवीन ही धनराजच्या घरीच राहायला गेली. आठवडाभरानंतर धनराजने आपले खरे रंग दाखवायला सुरूवात केली.

Loading...


लहानसहान कारणांवरून त्यांच्यात भांडणं होऊ लागली. तो तिला मारहाण करू लागला. धनराजमध्ये बदल होईल या आशेने परवीन दिवस काढू लागली. मात्र धनराजचा छळ वाढतच गेला. एक दिवस हॉटेलमध्येच दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. घरी गेल्यावर धनराजने तिला एका खोलीतच डांबून ठेवलं.


तो तिला मारझोड करू लागला. सिगारेटचे चटके देण्यापर्यंत त्याची मजल गेली. त्याने तिचा मोबाईल फोनही हिसकावून घेतला होता. नंतर धनराज घरात नाही हे बघून तिने इंन्स्टाग्रामवरून इराणमधल्या मित्राला छळाची कहाणी सांगितली आणि फोटोही पाठवले.


त्या मित्राने पुणे पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी धनराजच्या घराची झडती घेतली आणि परवीनची सुटका केली. पुणे पोलीस आता अधिक तपास करत आहेत.


 

VIDEO : पैसे परत कर म्हणत तृतीयपंथियांनी फाडले 'त्याचे' कपडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2018 05:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com