IPS अधिकारी भाग्यश्री नवटकेंची बदली, हाच तो VIDEO ज्यामुळे झाली कारवाई

IPS अधिकारी भाग्यश्री नवटकेंची बदली, हाच तो VIDEO ज्यामुळे झाली कारवाई

एका मोबाईल क्लिपमध्ये त्यांनी दलित आणि मुस्लिम तरुणांना मी कशी मार देते, याचा उल्लेख केला होता.

  • Share this:


शशी केवडकर,प्रतिनिधी

बीड,03 डिसेंबर : बीडच्या वादग्रस्त आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटकेंची बदली कऱण्यात आली आहे. दलित आणि अॅट्रॉसिटिविरोधात त्यांनी वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांची बदली औरंगाबादला करण्यात आली आहे.

बीडमधल्या माजलगावच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके रातोरात वादाच्या कचाट्यात सापडल्या आहेत. त्यामागचं कारण म्हणजे संपूर्ण राज्यभर व्हायरल झालेली मोबाईल क्लिप... या मोबाईल क्लिपमध्ये त्यांनी दलित आणि मुस्लिम तरुणांना मी कशी मार देते, याचा उल्लेख केला होता.

न्यूज 18 लोकमतनं या क्लिपची सत्यता पडताळलेली नाही. मात्र या क्लिपमधल्या दृश्यांवर आणि शब्दांवर विश्वास ठेवायचा झाला तर, आयपीएस दर्जाचे अधिकारी देखील जातीयवादाच्या तराजूत गुन्हेगारांना तोलतात का? असा सवाल उभ्या महाराष्ट्राला पडू शकतो.

कारण दलितांवर आणि मुस्लिमांवर करण्यात आलेल्या अनन्वित अत्याचाराचं कथन, खुद्द भाग्यश्री नवटकेंकडून करण्यात आल्याचा आरोप होतोय.

काय म्हणाल्या नवटके?

मी 6 महिन्यांत 21 दलितांन फोडलंय...

फोडलंय ना..?

मुस्लिमांना फोडलंय..

सगळ्यांना एवढा स्ट्राँग मेसेज दिलाय की मॅडम कुणालाच सोडत नाही.

तुम्हाला माहित आहे का दलितांना कसं मारतो आम्ही?

पाय बांधून, हात बांधून मारतो आम्ही..

ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटकेंविरोधात अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करून, त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली जात आहे. तर बीडच्या पोलीस अधीक्षकांनी तूर्तास या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे अखेर संध्याकाळी त्यांची बदली करण्यात आली.

वादग्रस्त संभाषणाच्या या मोबाईल क्लिपनं भाग्यश्री नवटाकेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. या प्रकरणी न्यूज 18 लोकमतनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला.

=====================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2018 06:29 PM IST

ताज्या बातम्या