S M L

पुणेकरांचं पाणी आयपीएलसाठी वापरू नका -मुंबई हायकोर्टाचे आदेश

एमसीए आणि राज्य सरकारमध्ये पाण्याच्या वापरावरून एक करार झाला होता. पण या करारातच त्रुटी असल्याचं हायकोर्टाचं म्हणणं आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Apr 18, 2018 07:54 PM IST

पुणेकरांचं  पाणी आयपीएलसाठी वापरू नका -मुंबई हायकोर्टाचे आदेश

 पुणे,18 एप्रिल: पुणेकरांचं पाणी आयपीएलसाठी वापरू नका असे आदेशच मुंबई हायकोर्टाने आता  महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनला दिले आहेत . पवना नदीच्या धरणातलं पाणी  आयपीएलच्या सामन्यांसाठी   स्टेडिअमवर वापरलं जातं होतं.

एमसीए आणि राज्य सरकारमध्ये पाण्याच्या वापरावरून एक करार झाला होता. पण या करारातच त्रुटी असल्याचं  हायकोर्टाचं म्हणणं आहे. या करारामध्ये औद्योगिक कारणांसाठी पाणी वापरणार असल्याचं म्हटलं आहे. यावरच बोट ठेवत मुंबई हायकोर्टाने   ही परवानगी नाकारली आहे. यासंबंधीत याचिका 2016मध्ये करण्यात आली होती.

पण या निर्णयामुळे  आय़पीएल मात्र कोंडीत सापडलंय. चेन्नईत झालेल्या गदारोळामुळे चेन्नई होणारे सगळे सामने पुण्यात हलवण्यात आले आहेत.  पण आता पुण्यातही सामने होणं कठीणच आहे. कारण हायकोर्टाने पुण्याचं पाणी वापरण्यावरच बंदी केली आहे. पुण्याची वाढती लोकसंख्या आणि शहराचा होणारा विस्तार पाहता पुणे शहराला पाणी पुरतं नाही .त्यातच आयपीएलमुळे पुण्यात पाणी टंचाई  उद्भवते आहे.  आता या साऱ्याचं पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 18, 2018 07:54 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close