कोंढाणे धरण घोटाळ्याप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी सुरूच राहणार

कोर्टाने तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांची चौकशी सुरुच राहणार असल्याचं आरोपपत्राच्या शेवटी नमुद केलंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 11, 2017 08:21 PM IST

कोंढाणे धरण घोटाळ्याप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी सुरूच राहणार

11 सप्टेंबर :रायगड जिल्ह्यातल्या कोंढाणे धरण घोटाळ्यात आज एसीबीनं ठाणे कोर्टात आरोपपत्र दाखल केलं. या आरोपपत्रात पाच अधिकारी आणि एक कंत्राटदार अशा सहा जणांची नावं आहेत.

तर कोर्टाने तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांची चौकशी सुरुच राहणार असल्याचं आरोपपत्राच्या शेवटी नमुद केलंय.

ठाणे जिल्ह्यातल्या कोंढाणे धरण घोटाळ्यात आज आरोपपत्र दाखल केलं गेलं.  एसीबीनं ठाणे कोर्टात आज ३ हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं. गेल्या वर्षी याबाबत तक्रार दाखल झाली होती. आरोपपत्र दाखल करायला एसीबीला १ वर्षं लागलंय. एफ. ए. एंटरप्रायझेस या कंत्राटदारामुळे राज्य सरकारला ९० कोटींचं नुकसान झालं असा दावा एसीबीनं केलाय.

 काय आहे कोंढाणे घोटाळा ?

- कोंढाणे धरण प्रकल्पाला १९८४मध्ये मंजुरी

Loading...

- पण तेव्हापासून प्रकल्प कागदावरच

- अधीक्षक अभियंते आर. डी. शिंदेंकडून २०१०मध्ये मंजुरी

- १६ ऑगस्ट २०११ -  के.आय.डी.सी. कार्यकारी संचालकांची सही

- नंतर सुनील तटकरेंचीही सही

- कंत्राटदार एफ. ए. एंटरप्रायझेस पात्र नसूनही कंत्राट दिलं

- वन आणि पर्यावरण खात्याची परवानगी घेतली नाही

- धरणाची उंची बेकायदेशीररित्या वाढवली

- कंत्राटदारामुळे राज्य सरकारला ९० कोटींचं नुकसान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2017 04:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...