News18 Lokmat

'इंटरनेट'ने वेड लावलंय? आता पुण्याने शोधला एक नवीन उपाय

राज्यातील 25 टक्के लोकसंख्या इंटरनेट व्यसनाच्या आहारी गेली असून त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Nov 19, 2018 10:24 AM IST

'इंटरनेट'ने वेड लावलंय? आता पुण्याने शोधला एक नवीन उपाय

पुणे, ता. 19 नोव्हेंबर : सध्याचा काळ हा इंटरनेटचा काळ आहे. इंटरनेटशिवाय पानही हलत नाही असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. मात्र इंटरनेटच्या अतिवापरचे दुष्परिणामही आता समोर येत आहेत. त्यावर उपाय म्हणून पुण्यात राज्यातलं पहिलं इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र सुरू झालंय.


आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्रातर्फे हे अभिनव केंद्र सुरू करण्यात आलंय. अत्तापर्यंत फक्त दारू आणि ड्रग्जच्या आहारी गेलेल्यांसाठीच अशी व्यसनमुक्ती केंद्र उभारण्यात येत असे. काळ बदलल्याने आता लोक इंटरनेटच्याही आहारी जात असून तरूणांना त्याचं व्यसन लागल्याची माहिती या केंद्राचे संचालक डॉ. अजय दुधाणे यांनी दिलीय.


ते म्हणाले राज्यातील 25 टक्के लोकसंख्या इंटरनेट व्यसनाच्या आहारी गेली असून त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत. स्मार्टफोन आणि समाज माध्यमांच्या आहारी जाऊन रात्रभर जागरण केल्याने पुरेशी झोप न येणे, चिडचिडेपणा, एकटेपणा, शारीरिक, मानसिक संतुलन ढासळणे, संशयी वृत्ती वाढणे अशा गोष्टी दिसू लागल्या आहेत.

Loading...


ही बाब लक्षात घेऊनच आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्रानं हा नवा उपक्रम सुरू केल्याही माहितीही त्यांनी दिली. या केंद्रातर्फे 275 युवकांचं सर्वेक्षण करण्यात आलं त्यात ही बाब प्रकर्षाने जाणवली असही डॉ. अजय दुधाणे यांनी सांगितलं.

या केंद्रात ई व्यसन, ध्यान, समुपदेशन, किशोरवयीन मुलांच्या समस्या, भीती ,नैराश्य यावर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. विविध शाळा आणि कॉलेजेस मध्ये जनजागृती ही करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय.


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 19, 2018 10:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...