#WomensDay : गुगलनेही केला 'ती'चा सन्मान!

जगभरातल्या वेगवेगळ्या स्तरातील महिलांच्या कहानी यातून सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Mar 8, 2018 10:27 AM IST

#WomensDay : गुगलनेही केला 'ती'चा सन्मान!

08 मार्च : आजचा दिवस आहे तिच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा. आजचा दिवस आहे तिच्या शक्तीला, तिच्या सामर्थ्याला मान देण्याचा. आज जागतिक महिला दिन आहे. या जागतिक महिलादिनी गुगुलनंही महिलांच्या कर्तृत्वाला डुडलच्या माध्यमातून सलाम केला आहे. आजचं गुगल डूडल १२ कलाकार स्त्रियांच्या कथा अॅनिमेटेड आणि फोटोच्या स्वरुपात केलं आहेत. विशेष म्हणजे हा गुगल डुडल 8 मार्चला नाही तर 7 मार्चच्या संध्याकाळीच रिलीज करण्यात आला आहे.

जगभरातल्या वेगवेगळ्या स्तरातील महिलांच्या कहानी यातून सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यातली प्रत्येक स्त्री आपली वेगळी कहाणी मांडते. पण त्याचबरोबर जगभरातल्या स्त्रियांमध्ये काही गोष्टी समान असतात हेही हे डूडल जाणवून देतंय. शब्द आणि आकृतींच्या सहाय्यानं तयार करण्यात आलेलं हे डूडल आजच्या दिवशीचा संदेश देण्यात यशस्वी ठरेल अशी अपेक्षा गुगलच्या वतीनं व्यक्त करण्यात आली आहे.

खरंतर, रोज अखंडपणे असंख्य आव्हानांना सामोरं जात खंबीरपणे लढणाऱ्या असंख्य महिलांचा आजचा दिवस आहे. त्यामुळेच आज दिवसभर आपण न्यूज 18 लोकमतवर साजरा करणार आहोत तिचा दिवस, तिचा सन्मान.

गुगलच्या डुडलमध्ये 'या' आहेत 12 कहान्या!

Anna Haifisch – “Nov 1989”

Loading...

Chihiro Takeuchi – “Ages and Stages”

Esteli Meza – “My Aunt Blossoms”

Francesca Sanna – “The Box”

Isuri – “Aarthi the Amazing”

Karabo Poppy Moletsane – “Ntsoaki’s Victory”

Kaveri Gopalakrishnan – “Up on the Roof”

Laerte – “Love”

Philippa Rice – “Trust”

Saffa Khan – “Homeland”

Tillie Walden – “Minutes”

Tunalaya Dunn – “Inwards”

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 8, 2018 09:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...