व्याज आणि दंड माफ, पण विज बिल भराच !, ऊर्जामंत्र्यांची शेतकऱ्यांना विनंती

व्याज आणि दंड माफ, पण विज बिल भराच !, ऊर्जामंत्र्यांची शेतकऱ्यांना विनंती

विज बिलावरील व्याज आणि दंड माफ कऱण्यात आलाय. मात्र, विज बिल भरण्याची विनंती केलीये.

  • Share this:

01 नोव्हेंबर : शेतकऱ्यांना सात दिवसात वीज बिल भरणाऱ्याचा फतवा काढणाऱ्या प्रशासनाने शेतकऱ्यांचा थोडासा दिलासा दिलाय. विज बिलावरील व्याज आणि दंड माफ कऱण्यात आलाय. मात्र, विज बिल भरण्याची विनंती केलीये.

सात दिवसांत चालू वीज बिल भरा नाहीतर वीज कनेक्शन तोडण्यात येईल असा फतवा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढला होता. राज्यातल्या 41 लाख शेतकऱ्यांकडे 19 हजार कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी आहे असंही ऊर्जामंत्र्यांनी जाहीर केलं होतं. त्यांच्या निर्णयावर टीका झाल्यानंतर अखेर ऊर्जाखात्याने हा निर्णय मागे घेतलाय.

शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिलावरील व्याज आणि दंड माफ करण्यात आलाय.  सरकारने शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना दिली आहे. या योजनेत ज्या शेतकऱ्यांनी बीलं भरलेली नाहीत त्यांनी यात बील भरावं. यात कुठलाही दंड व्याज नाही. बिलाची मूळ रक्कम 11 हजार कोटी रूपये आहे. या मूळ बिलात सरकारने 4 रूपये कमी केले आहेत. शेतकऱ्यांनी पाच हप्त्यांमध्ये बील भराण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

आम्ही फक्त मुद्दल बिल मागतोय. बिल भरलं नाही तर वीज कुठून मिळणार म्हणून शेतकऱ्यांनी हे बिल भरावं असंही ऊर्जाखात्याने म्हटलंय. तसंच 19 हजार कोटी बिल थकीत झालं आहे. वितरण कंपनी एवढं वीज खर्च करू उचलू शकत नाही असंही स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2017 06:53 PM IST

ताज्या बातम्या