शेतकरी संपाचा परिणाम मार्केटवर नाही, भाज्यांची आवक वाढली, दर कोसळले

शेतकरी संपाचा परिणाम मार्केटवर नाही, भाज्यांची आवक वाढली, दर कोसळले

आज बाजारात 852 गाड्यांची आवक झालीये ,सोमवारी पुण्याच्या मार्केट कमिटीमध्ये साधारणपणे 750 गाड्यांची आवक होत असते आज मात्र हाच आकडा 852वर पोहोचल्याने शेतमालाचे दर कोसळलेत.

  • Share this:

मुंबई, 04 जून : शेतकरी संपाचा आजचा 4 था दिवस आहे,रविवारी या संपाचा जोरदार परिणाम पाहायला मिळाला होता,आवक कमी झाल्याने भाज्यांचे भाव हे 20 ते 25 टक्क्यांनी वाढलेले होते मात्र आज बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने आज भाज्यांचे भाव खाली आलेत.

आज बाजारात 852 गाड्यांची आवक झालीये ,सोमवारी पुण्याच्या मार्केट कमिटीमध्ये साधारणपणे 750 गाड्यांची आवक होत असते आज मात्र हाच आकडा 852 वर पोहोचल्याने शेतमालाचे दर कोसळलेत.

नाशिकमध्ये फळ भाज्यांचे भाव वाढल्यानं भाज्यांचे दर कमी झालेत. पोलीस बंदोबस्तात बाजार समितीचं काम सुरू करण्यात आलंय. फळभाज्यांचे भाव 50 टक्क्यांनी कमी आलेत. बाजार समितीमध्ये शेतकरी संपाचा परिणाम कमी झालेला पाहायला मिळाला.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2018 11:18 AM IST

ताज्या बातम्या