नगरच्या धामणे दांपत्याने 'माऊली सेवा प्रतिष्ठान'तून फुलवला मायेचा मळा

ज्यांचं कुणी नाही आणि ज्यांना कुटुंबियांनी वाऱ्यावर सोडलंय अशांसाठी हे नगरचं माऊली सेवा प्रतिष्ठान मायेचा ओलावा देणारं घर ठरलंय.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 28, 2018 04:07 PM IST

नगरच्या धामणे दांपत्याने 'माऊली सेवा प्रतिष्ठान'तून फुलवला मायेचा मळा

28 एप्रिल : नगर जिल्हा सध्या मोठ्या चर्चेत आहे तो काही दिवसांपूर्वी झालेल्या राजकिय हत्याकांडामुळे. नगरच्या बाबतीत अनेक नकारात्मक गोष्टी वारंवार घडत असतात. मात्र असं असलं तरी डॉ राजेंद्र आणि डॉ सुचिता धामणे या दाम्पत्यानं सुरू केलेलं काम तुमचा नगरकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलायला नक्कीच मदत करेल.

ज्यांचं कुणी नाही आणि ज्यांना कुटुंबियांनी वाऱ्यावर सोडलंय अशांसाठी हे नगरचं माऊली सेवा प्रतिष्ठान मायेचा ओलावा देणारं घर ठरलंय. अन्याय, अत्याचार, बलात्कार पीडित असोत कि मनोरुग्ण या सगळ्यांना माऊली सेवा प्रतिष्ठान आधार देतंय.

अन्यायग्रस्तांसाठी स्वतःचं असं हक्काचं घर ठरलेल्या माऊली सेवा प्रतिष्ठानची स्थापना केलीय. डॉ राजेंद्र धामणे आणि डॉ सुचेता धामणे या दाम्पत्यानं. वैद्यकिय सेवेतून बक्कळ पैसा मिळवणं असले प्रकार एका बाजूला वाढत असताना दुसरीकडे सेवाभावासाठी झटणारं हे डॉक्टर दाम्पत्य. 1998 साली डॉ. धामणे दाम्पत्यानं सुरू केलीली ही सेवा आजपर्यंत अविरतपणे सुरू आहे.

सुरुवातीला धामणे दाम्पत्य केवळ अनाथांची सेवा करत होते. नंतर त्यांना अत्याचारग्रस्त आणि मनोरुग्णांच्या विदारक आयुष्याची जाणिव झाली आणि 2005 पासून त्यांनी अशा पीडितांची सेवाही सुरू केली.

अशा रुग्णांवर उपचार करणं खूप महागडं असतं. त्यामुळे या डॉक्टर दाम्पत्यानं वडिलोपार्जित जागेत काम सुरू केलं. शिवंगे इथं रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड, 5 खाटांची सोय असलेला अतिदक्षता विभाग आणि पॅथॉलॉजीही सुरू केलीय.

राजकिय गुंडगिरी, जातीय तेढ आणि अत्याचारांच्या घटनांमुळे नगर जिल्हा बदमान होत असला तरी नगरमध्ये सगळंच काही वाईट होतंय असं नाही. डॉ धामणे दाम्पंत्याने माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जपलेला सेवाभाव नगरची प्रतिमा उंचावण्यास नक्कीच मोठा हातभार लावतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 28, 2018 04:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close