इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या तरुणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या तरुणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणाने रहाटणी इथं रहात्या घऱी इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केलीये

  • Share this:

16 मे : इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणाने रहाटणी इथं रहात्या घऱी इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केलीये. निनाद पाटील असं या तरुणाचं नाव आहे.

रहाटणी इथं वर्धमान हाईट्स या इमारतीत राहणारा निनाद देशभूषण पाटील हा इन्फोसीस कंपनीत काम करत होता. आज दुपारी बाराच्या सुमारास निनादने इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. त्याला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईट नोट लिहिली होती. यात आपण स्वइच्छेने आत्महत्या करत असल्याचं म्हटलंय. नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. वाकड पोलीस पुढील तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2017 07:12 PM IST

ताज्या बातम्या