अपात्र आणि अर्ज न भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार, चंद्रकांत पाटलांची घोषणा

जे शेतकरी कर्जमाफीचा मधून बाजूला काढले असतील. त्यांच्यासाठी आम्ही एक समिती स्थापन केली आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 25, 2017 07:44 PM IST

अपात्र आणि अर्ज न भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार, चंद्रकांत पाटलांची घोषणा

25 डिसेंबर : जे शेतकरी कर्जमाफी योजनेतून अपात्र झालेत त्यांच्यासाठी तालुका पातळीवर पुन्हा एक समिती नेमणार असून त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलीये. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा बोजवारा उडलाय. अजूनही शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळालेले नाही. आता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय.

चुकीच्या माणसाला पैसे जाऊ नयेत म्हणून चेक करून शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. जे शेतकरी कर्जमाफीचा मधून बाजूला काढले असतील. त्यांच्यासाठी आम्ही एक समिती स्थापन केली आहे. ही समिती शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेईल जर काही जणांना चुकून वगळले असेल तर त्यांना पुन्हा एकदा यादीत घेऊन लाभ देणार अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली.

तसंच ज्या शेतकऱ्यांचा फाॅर्म भरायचा राहिला असेल त्याला सुद्धा पुन्हा एकदा कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी मुदत देणार असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2017 07:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...