पाकच्या गोळीबारात महाराष्ट्राचा वीरपुत्र किरण थोरात शहीद

काल पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात जवान किरण थोरात यांचा मृत्यू झाला.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Apr 12, 2018 10:45 AM IST

पाकच्या गोळीबारात महाराष्ट्राचा वीरपुत्र किरण थोरात शहीद

12 एप्रिल : जम्मू आणि काश्मीरच्या पूँछमध्ये पाकच्या गोळीबारात महाराष्ट्रातला जवान शहीद झाला आहे. किरण पोपटराव थोरात असं या वीरपुत्राचे नाव आहे. ते औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूरचे आहेत. तिथल्या फकिरबादवाडी गावात त्यांचं कुटुंब आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार सुरू आहे. काल पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात जवान किरण थोरात यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक दोन वर्षांची मुलगी आहे.

त्याआधी गेल्याच आठवड्यात पाकिस्तानने पुंछ जिह्यातील कृष्णाघाटी येथील नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात महाष्ट्रातील परभणीतील पालम तालुक्यातील कोनेरवाडी गावचे शिपाई शुभम मुस्तापूरे शहीद झाले होते.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 12, 2018 10:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...