थरारक ऑपरेशन : नौदलाने वाचवली बुडणारी बोट, असा वाचला सहा जणांचा जीव

'रेवती' बोटीवरून बेपत्ता झालेल्या एकाचा तटरक्षक दलाच्या दोन बोटी शोध घेत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 18, 2019 03:54 PM IST

थरारक ऑपरेशन : नौदलाने वाचवली बुडणारी बोट, असा वाचला सहा जणांचा जीव

मुंबई 18 मार्च : तटरक्षक दलाने सोमवारी सकाळी मुंबई किनाऱ्यापासून जवळ एका बुडणाऱ्या बोटीला वाचवलं. या बोटीवर सात जण होते. त्यातल्या सहा जणांना वाचविण्यात तटरक्षक दलाला यश आलं असून एकाचा शोध सुरू आहे.

सकाळी पावणेअकराच्या सुमारास 'रेवती' ही बोट समुद्रात बुडायला लागली.

त्यांनी बचावासाठी संदेश पाठवताच तटरक्षक दलाच्या 'अमर्त्य' या बोटीने तातडीने धाव घेतली. तारापूरजवळच्या किनाऱ्यावर रेवती' ला अपघात झाला होता.

बोटीवर असलेल्या सहा जणांना वाचविण्यात तटरक्षक दलाच्या जवानांना यश आलंय. मात्र एकाचा शोध लागत नाहीये. तटरक्षक दलाना त्या सहा जणांना तातडीने आपल्या बोटीवर आणून प्रथमोपचार केला आणि त्यांना सुरक्षीत किनाऱ्यावर पोहोचवलं.

'रेवती' बोटीवरून बेपत्ता झालेल्या एकाचा तटरक्षक दलाच्या दोन बोटी शोध घेत आहेत. या बोटींच्या मदतीसाठी नौदलाचं चेतक हे हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आल्याची माहिती तटरक्षक दलाने दिली आहे. 'रेवती' या बोटीला का अपघात झाला याचं कारण समजू शकलं नाही.

Loading...मच्छिमारी करण्यासाठी अनेक बोटी खोल समुद्रात जात असतात. मात्र खोल समुद्रात जाताना जी काळजी घ्यावी लागते ती काळजी या बोटीचे मालक घेत नाहीत. त्यांची डागडुज्जीही योग्य पद्धतीने केली जात नाही. त्यामुळे असे अपघात वारंवार घडतात.

नोदल आणि तटरक्षक दलाने अशा बोटींसाठी खास मार्गदर्शक तत्वही आखून दिले आहेत. त्याच पालन केलं तर अपघातांचं प्रमाण कमी होऊ शकते असं मत तटरक्षक दलाने व्यक्त केलंय. या बोटी भाड्याने घेऊन छोटे मच्छिमार आपला व्यवसाय करत असतात. मात्र बोटीची देखभाल योग्य पद्धतीने होत नसल्याने अपघात होतात आणि नाहक जीव जातात अशी खंतही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 18, 2019 03:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...