आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार...या आहेत 5 मोठ्या बातम्या

News18 Lokmat | Updated On: Feb 27, 2019 06:32 AM IST

आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार...या आहेत 5 मोठ्या बातम्या

अंतरिम अर्थसंकल्प सादर

आज राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. फडणवीस सरकार आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार दुपारी 2 वाजेच्या सुमारास अर्थसंकल्प सादर करतील. त्यामुळे कोण-कोणत्या घोषणा होतात हे पाहण्याचं ठरणार आहे.

मराठी भाषा दिन​ ​

आज मराठी भाषा दिनानिमित्त शिवसेनेनं संध्याकाळी 5 वाजता मुंबई एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मुंबईतील दादर परिसरातील रवींद्र नाट्यमंदीर येथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे.

दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणी बैठक

Loading...

नवी दिल्लीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून यात आगामी काळातील रणनीतीवर चर्चा होणार आहे. या कार्यकारिणीला सर्वच नेते हजर राहणार आहे.

धनगर आरक्षणासाठी 'चलो मुंबई'!

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुकारले आहे. धनगर समाजाच्या महाड ते मंत्रालय पदयात्रेला सुरुवात होणार आहे.

प्रकाश जावडेकर पत्रकार परिषद

नवी दिल्लीत केंद्रीय मनुष्यबळमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत जावडेकर महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.


===================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 06:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...