आज दिवसभरातील 5 महत्त्वाच्या बातम्या

आज दिवसभरातील 5 महत्त्वाच्या बातम्या

  • Share this:

सेनेची मातोश्रीवर बैठक

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना आणि भाजपची युती झाल्यानंतर मंगळवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीस मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यानंतर आज सेनेची पुन्हा एकदा बैठक होणार आहे. या बैठकीत उमेदवारांची नाव निश्चित होणार असल्याचं कळतंय.

 दिल्लीत  भाजपची बैठक

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक दिल्लीत पार पडणार आहे. या बैठकीला सर्वच वरिष्ठ नेते हजर राहणार आहे. या बैठकीत देशभरातील जागावाटपांबाबत चर्चा होणार आहे.

विदर्भात काँग्रेसची यादी

राज्य काँग्रेसची आज बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये पूर्व विदर्भातील उमेदवारांची पहिली यादी काँग्रेस जाहीर करण्याची शक्यता आहे. नागपूरमधून नाना पटोले यांनी उमेदवारी मागितली आहे. या जागेवर बराच वाद सुरू आहे.

शरद पवारांचा कार्यकर्त्यांशी संवाद

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज ठाणे-कल्याण येथील कार्यकर्त्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधणार आहे. यावेळी ते कार्यकर्त्यांना निवडणुकीसंदर्भात पक्षाची भूमिका मांडणार आणि मार्गदर्शनही करणार आहे.

अब्दुल सत्तार दानवेंच्या विरोधात?

जालना मतदारसंघात भाजपचे प्रदेश रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यात उमेदवारीवरून धुसफूस सुरू आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी मंत्री अब्दुल सत्तार हे दानवेंच्या विरोधात उभे राहण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने औरंगाबादेत आज सकाळी 11 वाजता  पत्रकार परिषद होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2019 11:59 PM IST

ताज्या बातम्या