उद्धव ठाकरे-मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर... आजच्या 5 मोठ्या बातम्या

उद्धव ठाकरे-मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर... आजच्या 5 मोठ्या बातम्या

  • Share this:

चिपी विमानतळाचं लोकार्पण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण आज सकाळी 11 वाजता होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत आणि स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नारायण राणे उपस्थित राहणार आहे.

उद्धव-मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर

मुंबईत आज महाराष्ट्राचं उद्योग धोरण या विषयावर  संध्याकाळी 7 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शिवसेनेचे पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे  आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका व्यासपीठावर येणार आहे. नरीमन पाँईंट येथील ट्रायडंट हाॅटेलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

राष्ट्रवादीची पुण्यात बैठक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरूच आहे. आज पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुण्यातील जागेसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदींची सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी  दोन दिवसांपासून गुजरात दौऱ्यावर आहे. नरेंद्र मोदी यांची उद्या धरमध्ये सभा होणार आहे. दरम्यान, सोमवारी गुजरातमध्ये झालेल्या सभेत 'भारतात दहशतवाद पसरवणाऱ्या पाकिस्तानला आता घरात घुसून मारू' असा थेट आणि कठोर इशारा मोदींनी दिला होता.

भारत – ऑस्ट्रेलिया दुसरा एकदिवसीय सामना

भारत आणि आॅस्ट्रेलियादरम्यान आज दुसरा एकदिवसीय सामना खेळवणाला जाणार आहे. पहिला सामना हा भारताने जिंकला असून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. दुपारी 1.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे.


=====================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2019 06:17 AM IST

ताज्या बातम्या