कन्यादानाआधी लेकीची काढली मिरवणूक, बापाचं प्रेम पाहून तुम्हीही म्हणाल 'एक नंबर'

कन्यादानाआधी लेकीची काढली मिरवणूक, बापाचं प्रेम पाहून तुम्हीही म्हणाल 'एक नंबर'

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील मुलीच्या बापाने चक्क मुलीची घोड्यावरून मिरवणूक काढली. आणि मिरवणुकीसाठी उपस्थित गावकऱ्यांना रोपं वाटून वृक्षसंवर्धनाचा संदेशही दिला.

  • Share this:

हरिष दिमोटे, प्रतिनिधी

शिर्डी, 08 मे : लग्न म्हटलं की सगळ्यात भार मज्जा असते ती नवरदेवाच्या मिरवणूकीला. लग्नाच्या आधल्या दिवशी नवरदेवाची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. पण याच प्रथेला ग्रामीण भागात मोडीत काढत वडिलांनी लेकीची मिरवणूक काढली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील मुलीच्या बापाने चक्क मुलीची घोड्यावरून मिरवणूक काढली. आणि मिरवणुकीसाठी उपस्थित गावकऱ्यांना रोपं वाटून वृक्षसंवर्धनाचा संदेशही दिला. या अनोख्या आदर्शामुळे नवरीच्या वडिलांचं मोठं कौतूक होत आहे.

लग्नासाठी रवाना होताना आधल्या दिवशी गावातून नवरदेवाची वाजत गाजत मिरवणूक काढण्याची शेकडो वर्षापासून परंपरा आहे. मात्र, संगमनेर तालुक्यातील निमज गावातील पद्माकर मतकर यांनी आपल्या मुलीची घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढली. या मिरवणुकीत सगळं गाव सहभागी झालं होतं. आपल्या मुलीच्या मिरवणुकीत गावही आल्यामुळे पद्माकर यांचा आनंद ओसंडून वाहत होता.

हेही वाचा : वरमाला घालतानाच नवरदेवाच्या वडिलांची हत्या, नवरीऐवजी मृतदेह घेऊन परतलं वऱ्हाड


मुलीची मिरवणूक काढण्याबरोबरच मतकर यांनी सामाजिक संदेशही दिला. मुलीच्या डोक्यावर अक्षदा टाकण्याऐवजी फुलांच्या पाकळ्यांनी तिचं सर्वजण स्वागत करत होते तर 'एक वधू पन्नास झाड' अशी घोषण देत सुवासनींना झाडांचं वाटप करत वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. या अनोख्या आयोजनाने नववधुही खुप आनंदी झाली होती.


'मुलगा-मुलगी एकसमान' असं केवळ म्हणून चालणार नाही तर मुलींनाही अशा प्रकारे समानतेची दिलेली संधी सर्वांसाठी नक्कीच आदर्श आहे. पद्माकर यांच्या या आदर्शात सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

SPECIAL REPORT: नगरमधल्या 'सैराट'चं सत्य...निघोजमध्ये 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2019 06:03 PM IST

ताज्या बातम्या