S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

Morning Alert: आज दिवसभर या महत्त्वाच्या बातम्यांकडे असेल लक्ष

महाराष्ट्रातला या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्यांकडे आज सगळ्यांचं लक्ष असणार आहे. जाणून घ्या आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाच्या ज्याची जोरदार चर्चा आज दिवसभर पाहायला मिळणार आहे.

Updated On: Oct 19, 2018 07:50 AM IST

Morning Alert: आज दिवसभर या महत्त्वाच्या बातम्यांकडे असेल लक्ष

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला थेट लक्ष्य केलं. युती तुटताना जी घोषणा केली होती, त्याच घोषणेवर आम्ही आम्ही कायम आहोत. ती घोषणा काय होती हे शिवसैनिकांना समजलं असं सांगत त्यांनी भाजपशी जुळवून घेणार नाही हे स्पष्ट केलं.

सविस्तर वाचा...

मुंबईतल्या इंदू मिलवरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम सरकार लवकरच पूर्ण करेल. 2020 पर्यंत स्मारकाचं लोकापर्ण करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी दिलं.सविस्तर वाचा...

सरकार फक्त सरकारी कामकाज करतय. दुष्काळाने लोक होरपळत आहेत. कर्नाटकाने दुष्काळ जाहीर केला मात्र महाराष्ट्र सरकार टाळाटाळ करतेय. कसले सर्व्हे आणि समित्या नेमुन अभ्यास करताय. थेट दुष्काळ जाहीर करा.

सविस्तर वाचा...

शहरी नक्षलवाद हा भारतासमोरील सर्वात मोठा धोका असून सरकारने यावर कडक कारवाई करावी, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी कार्यक्रम होत आहे.

सविस्तर वाचा...

शिर्डीमध्ये साईबाबांच्या शताब्दी महोत्सवाची सांगता पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. गेले 3 तीन शिर्डीमध्ये साईबाबांचा शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. आज या महोत्सवाची सांगत होणार आहे.मंदिर भेटी नंतर जाहिर सभेला पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत.

सविस्तर वाचा...

‘लपून-छपून वार करू नका, तर समोर येऊन लढा’, असं म्हणत भाजप नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्षरित्या आव्हान दिलं. तर...!

सविस्तर वाचा...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2018 07:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close