बडव्यांची बंडखोरी.. बडवे समाजाने पंढरपुरात उभारले स्वतंत्र विठ्ठल मंदिर

पंढरपुरात बडव्यांची बंडखोरी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. समस्त बडवे समाजाने पंढरपुरात विठ्ठलाचे स्वतंत्र मंदिर उभारले आहे. पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनाही करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 10, 2019 08:56 PM IST

बडव्यांची बंडखोरी.. बडवे समाजाने पंढरपुरात उभारले स्वतंत्र विठ्ठल मंदिर

पंढरपूर, 10 मे- पंढरपुरात बडव्यांची बंडखोरी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. समस्त बडवे समाजाने पंढरपुरात विठ्ठलाचे स्वतंत्र मंदिर उभारले आहे. पांडुरंगाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनाही करण्यात आली आहे. पांडुरंग कृष्णाजी बडवे यांच्या घराजवळ समस्त बडवे समाजाने विठ्ठलाचे स्वतंत्र मंदिर उभारले आहे.  15 जानेवारी 2014 पासून खंडीत झालेली उपासना पुन्हा सुरू करण्यासाठी स्वतंत्र विठ्ठल मंदिर बांधले आहे. पंढरपूरमध्ये बाबासाहेब बडवे यांनी बांधलेल्या विठ्ठल मंदिरात विठ्ठल मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या प्रदक्षिणा मार्गावरील काळा मारुती मंदिराजवळील उत्पात समाजाच्या वसिष्ठ आश्रम येथे रुक्मिणीमातेचे मंदिर उभारले आहे.

विठ्ठल मंदिराचा ताबा गेल्यानंतर बडवे यांनी वेगळे विठ्ठल मंदिर उभारल्याचे समजते.दरम्यान, विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारींवरून महाराष्ट्र शासनाने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ताब्यात घेतले आहे. बडवे-उत्पात आणि सेवाधारी यांचे हक्क-अधिकार संपुष्टात आणले. शासनाने मंदिर ताब्यात घेऊन न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बडवे-उत्पात आणि सेवाधारी मंडळींनी 27 वर्षे लढा दिला होता. 15 जानेवारी 2014 रोजी सुप्रीम कोर्टाने बडवे-उत्पात आणि सेवाधाऱ्यांचे हक्क मोडीत काढून मंदिर शासनाच्या ताब्यात दिले.

देवाची परंपरागत पूजा करणाऱ्या बडवे-उत्पात आणि सेवाधारी मंडळींच्या हक्कांवर कोर्टाने गदा आणली. त्यामुळे बडवे आणि उत्पात मंडळींनी देवाच्या प्रति असलेली भक्ती अन् रूढी-परंपरा जतन करण्यासाठी विठ्ठल-रखुमाईचे स्वतंत्र मंदिर उभारणीचे काम हाती घेतले होते. आज त्याच विठ्ठल मंदिरात विठ्ठल मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.


धक्कादायक! कुख्यात गुंडाचा पोलीस व्हॅनमधील टिकटॉक VIDEO व्हायरल

Loading...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2019 08:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...