S M L

बलात्काराचा आरोपी कोर्टातून जामिनावर सुटला, बाप-लेकीने कोयत्याने तोडला

इंदापूर तालुक्यात बलात्कारी आरोपीचा मुलीच्या बापानेच भरचौकात निर्घृण खून केलाय. हा मुलगा नुकताच बलात्काराच्या गुन्ह्यात जामिनावर सुटला होता. विशेष म्हणजे या हत्याप्रकरणात फिर्यादी मुलगीही सहभागी होती. या घटनेमुळे नीरा-नृसिंहपूर गावात मोठी खळबळ उडालीय.

Chandrakant Funde | Updated On: Aug 11, 2017 07:59 PM IST

बलात्काराचा आरोपी कोर्टातून जामिनावर सुटला, बाप-लेकीने कोयत्याने तोडला

इंदापूर, प्रतिनिधी, 10 ऑगस्ट: इंदापूर तालुक्यात बलात्कारी आरोपीचा मुलीच्या बापानेच भरचौकात निर्घृण खून केलाय. हा मुलगा नुकताच बलात्काराच्या गुन्ह्यात जामिनावर सुटला होता. विशेष म्हणजे या हत्याप्रकरणात फिर्यादी मुलगीही सहभागी होती. काल दुपारी तीनच्या सुमारास नीरा-नृसिंहपूर गावातील भरचौकात हा गुन्हा घडला. या प्रकारात मृत तरुणाचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी आरोपी बापाला अटक करण्यात आलीय. नीलेश नागनाथ घळके (वय १७, रा. नीरा-नृसिंहपूर, ता. इंदापूर) असं खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या आईने याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबतची सविस्तर हकिकत अशी, फिर्यादी सुनीता घळके व आरोपी हे एकमेकांचे नातलग असून शेजारीच रहातात. पीडित मुलीने १० एप्रिल २०१७ रोजी नीलेश नागनाथ घळके व श्रीकांत पोपट घळके (रा. गणेशगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या दोघांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात बलात्कार केल्याची तक्रार दिली होती. यावरून गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात श्रीकांत घळके याला अटकही झाली होती. पण आरोपी अल्पवयीन असल्याने कोर्टाने त्याला जामिनावर सोडलं होतं. यामुळे बाप-लेक त्याच्यावर चिडून होते. फिर्यादीच्या घरी येऊन ते सतत 'न्यायालयाने त्याला सोडले असले तरी मी सोडणार नाही,' अशी धमकी देत होते. म्हणून मग घाबरलेल्या घळके कुटुंबीयांनी नीलेशला इंदापूर येथील होस्टेलवर ठेवले होते. तो घरी येत नव्हता. इंदापुरातच शिक्षण घेत होता.

नीलेशची परीक्षा संपल्याने तो गुन्हा घडण्याच्या दिवशी घरी आला. एवढ्यातच हातात कोयते घेऊन आरोपी व त्याची मुलगी हे दोघेही घरात घुसले. यावेशी नीलेशचे वडील नागनाथ श्यामराव घळके यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी बापाने त्यांच्यावरही कोयत्याने वार केले. यादरम्यान, बलात्काराचा आरोप असलेला मुलगा गावात पळून गेला, पण त्वेषाने पेटलेल्या या बाप-लेकीने त्याचा पाठलाग करून पकडले आणि भरचौकात त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यातच या मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे इंदापूर गावात मोठी खळबळ उडालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2017 07:46 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close