S M L

...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी

एक गोष्ट नारायण राणे तुम्हाला सांगू इच्छितो की, आता तुम्ही आमचे विरोधक आहात आणि त्यामुळे संघर्ष तर होणारच आणि संघर्ष झाल्यानंतर आम्हाला कुठं लांब जावं लागणार नाही

Sachin Salve | Updated On: May 27, 2018 05:49 PM IST

...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी

सिंधुदुर्ग, 27 मे : राज्यसभेचे खासदार नारायण राणेंनी  उभारलेल्या लाईफटाईम या अत्याधुनिक रूग्णालयाचं दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं.

रूग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान रूग्णालयाचा उद्घाटन सोहळा रंगला तो वेगवेगळ्या नेत्यांनी नारायण राणेंना दिलेल्या शुभेच्छांमुळे..

राणे आणि आमच्यात जर संघर्ष झाला, तर संघर्षानंतरची सोय राणेंनी आधीच करून ठेवली आहे, अशी कोपरखळी पवार यांनी मारताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तर माणसाला पुन्हा आजारी पडावसं वाटेल इतकं अत्याधुनिक हॉस्पिटल राणेंनी उभारलंय अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी स्तुती केली. राणेंचं लाईफटाईम हॉस्पिटल मेडिकल टुरिझमचं महत्त्वाचं केंद्र ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

कोण काय म्हणालं ?

Loading...
Loading...

देवेंद्र फडणवीस

अमेरिकेत हार्टच ऑपरेशन करायचं झालं तर पन्नास लाख लागतात आपल्या देशात टुरीझम सहित पंधरा वीस लाखात भागतं. मेडिकल टुरीझम वाढेल.

चंद्रकांत पाटील

उद्घाटन केल्यानंतर राणेंनी इथली व्यवस्था किती अॅडव्हान्स आहे हे दाखवल्यानंतर असं वाटलं की आजारी पडावं अशी कधी प्रार्थना नसते पण हॉस्पिटलमध्ये राहायला मिळावं ती पाहिल्यानंतर वाटलं की, एकदा तरी आजारी पडलं पाहिजे कारण इतक्या सुंदर हॉस्पिटलमध्ये राहायला मिळेल.

शरद पवार

एक गोष्ट नारायण राणे तुम्हाला सांगू इच्छितो की, आता तुम्ही आमचे विरोधक आहात आणि त्यामुळे संघर्ष तर होणारच आणि संघर्ष झाल्यानंतर आम्हाला कुठं लांब जावं लागणार नाही तशी व्यवस्था तुम्ही या ठिकाणी विरोधकांची उत्तम केलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 27, 2018 05:49 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close