माऊली दिवेघाटातून सासवडला

माऊली दिवेघाटातून सासवडला

दुपारी तीननंतर पालखी दिवेघाटात येते, त्या आधी पहाटेपासूनच वारकरी दिवेघाट चढायला सुरुवात करतात.

  • Share this:

20 जून : दोन दिवसांची विश्रांती आणि पुणेकरांचा पाहुणचार आटोपून माऊली आणि तुकोबांच्या पालख्यांनी सकाळी सहा वाजता प्रस्थान ठेवलं, माऊली दिवेघाटातून सासवडला तर तुकोबाराय लोणी काळभोरला मुक्कामी जाणार आहेत, यात लक्षवेधी असतो तो माऊलींच्या पालखीचा दिवेघाटातला प्रवास.

दुपारी तीननंतर पालखी दिवेघाटात येते, त्या आधी पहाटेपासूनच वारकरी दिवेघाट चढायला सुरुवात करतात. दिवेघाटातल्या वारकऱ्यांच्या  प्रवासाचं दृश्य अतिशय नयनरम्य असतं, पालखी जेव्हा घाटात येते तेव्हा वारकरी सर्व शीण विसरून जातात, हे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी नागरिकांचीही दिवेघाटात गर्दी असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2017 10:11 AM IST

ताज्या बातम्या