S M L

विदर्भात बोंड अळीमुळे कापूस हाताळणाऱ्या शेतकऱ्यांना इन्फेक्शन

आता बोंड अळीमुळं कापूस हाताळणाऱ्या शेतकऱ्यांना इन्फेक्शन होत असल्याची नवी बाब पुढे आलीय. यामुळं कापूस उत्पादक आणि मजूर पुरते धास्तावलेत.

Sonali Deshpande | Updated On: Mar 5, 2018 10:37 AM IST

विदर्भात बोंड अळीमुळे कापूस हाताळणाऱ्या शेतकऱ्यांना इन्फेक्शन

संजय शेंडे, अमरावती, 05 मार्च : विदर्भातल्या कापूस उत्पादकांसमोरची संकटं दिवसेंदिवस वाढत चाललीत. बोंडअळीनं राज्यातला ४५ टक्क्यांपेक्षा जास्त कापूस फस्त केल्यानंतर, आता बोंड अळीमुळं कापूस हाताळणाऱ्या शेतकऱ्यांना इन्फेक्शन होत असल्याची नवी बाब पुढे आलीय. यामुळं कापूस उत्पादक आणि मजूर पुरते धास्तावलेत.

विदर्भ आणि राज्यातल्या कापूस शेतीला यंदा बोंडअळीनं चकवा दिलाय. राज्यातलं अंदाजे ४५ टक्क्यांपेक्षा जास्त कापसाचं पिक बोंड अळीनं फस्त केलंय. कापूस उत्पादकांना पुरतं जेरीस आणलेल्या या अळीचा आता नवा त्रास सुरु झालाय. शेवटच्या टप्प्यातला कापूस वेचणाऱ्यांना, कापूस साठवणाऱ्यांना म्हणजे कापूस हाताळणाऱ्यांना त्वचेचे विकार जडत असल्याची बाब समोर येतेय. अमरावती जवळच्या पिंपळखुटा गावातले शेतकरी या त्रासानं पुरते हैराण झालेत.

या गावातल्या अनंता लुटेंनी कापसाच्या पिकात जनावरं चरायला सोडली, पण जनावरंदेखील शेतात थांबली नाहीत. ट्रॅक्टर चालवणारा ड्रायव्हरदेखील या त्वचाविकारापासून सुटलेला नाही.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खाज सुटणे, शरीरावर फोड येणे यासारख्या प्रकारामुळं भितीचं वातावरण आहे. यावर डॉक्टरांकडेही पुरेसे उपचार नाहीत.

कापसातले शास्त्रज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञ यांनी एकत्रितपणे हा प्रकार तपासला पाहिजे. कापूस उत्पादक आजाराच्या भितीच्या सावटाखाली आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनानं पुढं येणं गरजेचं आहे. अन्यथा येणाऱ्या वर्षात कापसाची शेती धोक्यात येण्याची भीती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 5, 2018 10:37 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close