S M L

उदगावमध्ये निवृत्त प्राध्यापकाच्या घरी सशस्त्र दरोडा, पत्नीचा मृत्यू

काल मध्यरात्री 7 ते 8 दरोडेखोरांनी त्यांच्या घरावर दरोडा टाकलाय. यामध्ये दरोडेखोरांनी 24 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 50 हजार रुपये लंपास केलेत.

Sonali Deshpande | Updated On: Aug 14, 2017 10:26 AM IST

उदगावमध्ये निवृत्त प्राध्यापकाच्या घरी सशस्त्र दरोडा, पत्नीचा मृत्यू

संदीप राजगोळकर, कोल्हापूर, 14 आॅगस्ट :   कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील उदगावमध्ये एका निवृत्त प्राध्यापकांच्या घरात सशस्त्र दरोडा घालण्यात आलाय. आणि दरोडेखोरांच्या हल्ल्यात प्राध्यापकांची पत्नी ठार झालीय. या घटनेनं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय.

उदगावमधल्या मदरशाजवळ निकम मळा आहे. तिथं निवृत्त प्राध्यापक बाबूराव निकम अनेक वर्षांपासून राहतात. काल मध्यरात्री 7 ते 8 दरोडेखोरांनी त्यांच्या घरावर दरोडा टाकलाय. यामध्ये दरोडेखोरांनी 24 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 50 हजार रुपये लंपास केलेत. याला विरोध करणाऱ्या अरुणा निकम यांच्यावर दरोडेखोरांनी धारधार शस्त्रांनी वार केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर बाबूराव निकम यांच्यावरही दरोडेखोरांनी हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून मिरजमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.निकम दांपत्याचा 1 मुलगा डॉक्टर असून 2 मुले शिक्षक आहेत. घरात मुले, सुना, नातवंडे असताना हा दरोडा पडल्यानं या भागातल्या नागरिकांमध्ये घबराट पसरलीय. तर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 14, 2017 10:26 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close