S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

फरशा वाहणारा ट्रक उलटल्यानं 10 जणांचा मृत्यू

एसटी संपाचा एक भीषण अप्रत्यक्ष परिणाम झालाय. एसटी नाही म्हणून ट्रकमधून प्रवास केला आणि तोच ट्रक उलटला आणि १० जणांचा नाहक बळी गेला.

Sonali Deshpande | Updated On: Oct 21, 2017 02:09 PM IST

फरशा वाहणारा ट्रक उलटल्यानं 10 जणांचा मृत्यू

21 आॅक्टोबर : एसटी संपाचा एक भीषण अप्रत्यक्ष परिणाम झालाय. एसटी नाही म्हणून ट्रकमधून प्रवास केला आणि तोच ट्रक उलटला आणि १० जणांचा नाहक बळी गेला. तासगाव-कवठेमहांकाळ मार्गावर मणेराजुरी गावाजवळ हा अपघात झाला. 10 जण ठार झालेत तर 11 जण जण जखमी आहेत.

शहाबादी फरशी घेऊन जाणारा ट्रक कर्नाटकमधून कराडला जात होता. मनेराजुरी गावाजवळ एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रक पलटी झाला. एसटीचा संप असल्यानं हे प्रवासी फरशी वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून कर्नाटकच्या सिंधगीवरून कराडकडे येत होते.

हे सर्व जण मोलमजुरी करणारे होते. ते दिवाळीनिमित्त आपल्या कर्नाटकातल्या गावी गेले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 21, 2017 02:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close