समाजकंटकांनी विहिरीत कालवले विष, शेतकऱ्याने जनावरांसाठी केली होती उपलब्ध

News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2018 06:40 PM IST

समाजकंटकांनी विहिरीत कालवले विष, शेतकऱ्याने जनावरांसाठी केली होती उपलब्ध

इम्तियाज अहमद, ११ आॅक्टोबर : भुसावळ तालुक्यातल्या मोंढाळे इथल्या दीपक परदेशींच्या शेतातल्या विहिरीत अज्ञात समाजकंटकांनी कीटनाशक टाकल्याची घटना उघड झालीय. या घटनेमुळं गावकऱ्यांनीही संताप व्यक्त केलाय. या भागात सध्या भीषण दुष्काळ आहे. अशा परिस्थितीत समाजकंटकांकडून पाण्यात विष कालवलं जात असल्यानं चिंता व्यक्त होतेय.

यावर्षी भुसावळ तालुक्यात भीषण दुष्काळ आहे. मोंढाळे येथे तर तालुक्यातून सर्वात जास्त भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत मोंढाळे येथील दीपक फुलचंद परदेशी यांनी शेतीच्या उत्पन्नावर पाणी सोडून त्यांचे मोंढाळा आणि शिंदी या रस्त्यावरील शेतातील विहीर गुरांना पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. याच विहिरीजवळ दीपक परदेशी यांनी गेल्या १० ते १२ वर्षांपासून गुरांना पाणी पिण्यासाठी स्वखर्चाने हौद बांधून दिला आहे.

या हौदाचा वापर मोंढाळेसह शिंदी येथील गुरांना उपयोग होत आहे. दररोज सुमारे ३०० ते ४०० गुरे या हौदावर पाणी पीत असल्याची माहिती दीपक परदेशी यांनी दिली. या रस्त्यावरून येणारे आणि जाणारे प्रवासी तसंच परिसरातील शेतकरी यांना उपयोग होत आहे.

अशा परिस्थितीत काही अज्ञात समाजकंटक व्यक्तीने सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास विहिरीत विष टाकण्याचा प्रयोग केल्यामुळे शिंदी, मोंढाळा आणि परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Loading...

परदेशी हे सायंकाळी सहा वाजेनंतर शेतात गेले. शेतातील विहिरीतील पाणी हे पांढऱ्या रंगाचे दिसायला लागले आणि पाण्याचा वासही येऊ लागला. त्यामुळे त्यांना विहिरीत कीटकनाशक टाकल्याचा संशय आला.

दरम्यान, परदेशी यांनी तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क केला. मात्र पोलीस मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या बंदोबस्तासाठी अडकले आहे. त्यामुळे उद्या मंगळवार, ९ रोजी पंचनामा करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी त्यांना दिली आहे.

=======================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2018 06:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...