पुढच्या २४ तासात मुंबई, कोकणात पडू शकतो मुसळधार पाऊस; विदर्भ कोरडाच!

पुढच्या २४ तासात मुंबई, कोकणात पडू शकतो मुसळधार पाऊस; विदर्भ कोरडाच!

रोह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. येत्या 24 तासात आणखी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय.

  • Share this:

रायगड, 17 ऑक्टोबर : पश्चिम महाराष्ट्रासह कोकण आणि गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झालेली असताना मंगळवारी सायंकाळी आणि बुधवारी सकाळी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पावसाळ्यातलं शेवटचं नक्षत्र सुरू असताना बुधवारी रायगड जिल्ह्यातही ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. रोह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. येत्या 24 तासात आणखी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय.

या पावसाने मालवण, वेंगुर्ले, पेडणे, पाल्पोई, दोडामार्ग, म्हापसा, वैभववाडी, दाभोलीम, मडगाव, मार्मागोवा, देवगड, कणकवली, कुडाळ, लांजा, संगमेश्वर, सावंतवाडी, सोलापू, कोल्हापूर, अक्कलकोट, गडहिंग्लज, भुदरगड, तुळजापूर आदि ठिकाणीही कमी-अधीक प्रमाणात हजेरी लावली. येत्या 24 तासात दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगजजनेसह पाऊस पडण्याची शक्यता मुंबईच्या हवामान खात्यानं वर्तवलीय.

गेल्या आठवडाभरापासून राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा सुरू असला तरी, बुधवारी सकाळपासून मुंबई आणि तिच्या काही उपनगरांवर ढगांनी दाटी केली आहे. सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासात सांताक्रूजमध्ये कमाल 37.2 अंश सेल्सियस आणि किमान 25.6 अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं. तर कुलाब्यात कमाल 35.7 आणि किमान 26 अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं. पश्चिम महाराष्ट्रात अशी स्थिती निर्माण झालेली असताना विदर्भात मात्र हवामान कोरडं होतं.

कोकण आणि गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झालीय, तर विदर्भाच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात ही वाढ किंचित असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलंय.

 VIDEO: वाहन तपासणी करताना कार चालकानं वाहतूक पोलिसालाच उडवलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2018 06:55 PM IST

ताज्या बातम्या