S M L
Football World Cup 2018

काँग्रेस नेते विश्वजीत कदमांनी सांगलीत घेतली राज ठाकरेंची भेट

ही भेट म्हणजे मैत्रीखातर होती आणि राजकीय चर्चा न होता महाराष्ट्रातल्या सामाजिक विषयांवर आमच्यात चर्चा झाली असं स्पष्टीकरण विश्वजीत कदम यांनी दिलंय.

Sonali Deshpande | Updated On: Jan 14, 2018 12:36 PM IST

काँग्रेस नेते विश्वजीत कदमांनी सांगलीत घेतली राज ठाकरेंची भेट

सांगली, 14 जानेवारी : सांगली जिल्ह्यातील औदुंबर इथे सदानंद साहित्य मंडळाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या सांगली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. आज सकाळी दहा वाजता युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजीत कदम यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

त्यानंतर ते दोघेही नेते सांगली शहरातल्या भारती विद्यापीठाच्या परिसरामध्ये आले, या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. पण ही भेट म्हणजे मैत्रीखातर होती आणि राजकीय चर्चा न होता महाराष्ट्रातल्या सामाजिक विषयांवर आमच्यात चर्चा झाली असं स्पष्टीकरण विश्वजीत कदम यांनी दिलंय.

'आमचे आधीपासून चांगले संबंध आहेत.राज साहेबांना भारती विद्यापीठाचा एक कॅम्पस पाहायचा होता. त्यासाठी मी त्यांची भेट घेतली,' असं कदम म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2018 12:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close