S M L
Football World Cup 2018

सांगलीतला 'हा' कोंबडा चक्क अण्णा...अण्णा असा आवाज देतो!

आजपर्यंत तुम्ही पोपट माणसाप्रमाणे बोलतो हे पाहिलं असेल. मात्र तुम्ही कधी कोंबडा बोलतो हे पाहिलं आहे का?

Renuka Dhaybar | Updated On: Mar 14, 2018 10:07 PM IST

सांगलीतला 'हा' कोंबडा चक्क अण्णा...अण्णा असा आवाज देतो!

14 मार्च : आजपर्यंत तुम्ही पोपट माणसाप्रमाणे बोलतो हे पाहिलं असेल. मात्र तुम्ही कधी कोंबडा बोलतो हे पाहिलं आहे का? नाही ना, तर आम्ही तुम्हाला आज अशाच एका बोलक्या कोंबड्याला भेटवणार आहोत.

सांगली जिल्ह्यातल्या आळसंदमधील या कोंबड्याची गावभर चर्चा सुरु आहे. त्याला कारणही तसचं आहे. कारण बहाद्दर कोंबडा चक्क माणसाप्रमाणे अण्णा अशी हाक मारतो. लक्ष्मन मोहिते यांना गावात सर्वजण अण्णा नावानं हाक मारतात. एकेदिवशी अण्णांच्या पत्नी हौसाबाई यांनी पाळलेल्या कोंबड्याला पकडं. त्यानतंर कोंबडा चक्क अण्णा नावानं ओरडू लागला.

आता अण्णांच्या घरी कोणीही आलं तर आधी तो बोलक्या कोंबड्याची भेट घेतो. मगच घरात येतो. अण्णा.. अण्णा नावानं हाक मारणाऱ्या या बोलक्या कोंबड्याला पाहायला परीसरातल्या लोकांचीही गर्दी होते.

आधी लक्ष्मन रावांनी हा कोंबडा विकायला काढला होता. मात्र त्यानं अण्णा अण्णा असा धावा केल्यानं त्याचा जीव वाचला आणि तो कुटुंबीयांचा लाडका झाला. पोपट बोलतो, हे आपल्याला माहीत आहे. पण अण्णा अशी हाक मारणारा हा कोंबडा विरळाच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2018 09:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close