मावळमध्ये 'चॉकलेट गँग'चा धुमाकूळ, म्होरक्या 'चॉकलेट अन्या'चा पोलिसांना गुंगारा

चित्रविचित्र नावं धारण करून या टोळ्या गुंडगीरी करत असतात. मोक्कासारख्या कायद्याचा वापर करूनही या गुंडांच्या टोळ्यांना वेसन घालण्यात पोलिसांना यश आलं नाही.

News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2019 09:25 PM IST

मावळमध्ये 'चॉकलेट गँग'चा धुमाकूळ, म्होरक्या 'चॉकलेट अन्या'चा पोलिसांना गुंगारा

अनिस शेख, मावळ 29 जुलै : पुणे,मावळ आणि परिसरात गुंडांच्या अनेक गँग सक्रिय आहेत. या गँगच्या गुंडांनी पोलिसांच्या नाकात दम आणलाय. जमिनीला आलेले सोन्याचे भाव, वाढतं औद्योगिकीकरण, राजकारण्यांचा आश्रय यामुळे हे गुंड आणि त्यांची गुंडगीरी वाढतच जातेय. चित्रविचित्र नावं धारण करून या टोळ्या गुंडगीरी करत असतात. मोक्कासारख्या कायद्याचा वापर करूनही या गुंडांच्या टोळ्यांना वेसन घालण्यात पोलिसांना यश आलं नाही. गेल्या काही महिन्यांपासून अशाच चॉकलेट गँगमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

VIDEO: रोहितसोबत वादावर विराट पहिल्यांदाच बोलला, टीकाकारांना दिलं ओपन चॅलेंज

या परिसरात अनेक गँग अस्तित्वात आहेत.कोयता गँग, रावण टोळी, पार्ले गँग अशा अनेक नावाने या गँग त्यांचे उद्योग करत असतात. मावळ मद्दये काही महिन्यांपूर्वी चॉकलेट गँग उदयास आली आणि काही गुन्हे एकत्र केल्या नंतर आता 'मोक्का'मुळे या टोळीचे अनेक गुंड जेरबंद झाले असले तरी या गँगचा म्होरक्या चॉकलेट अन्या मात्र पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झालाय. फरार अन्याच्या पोलीस आता शोध घेत आहेत.

Kidney stone मुतखड्याचा त्रास असेल तर 'हे' 6 पदार्थ खाणं आजच कमी करा

खून, अपहरण अशा अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांसाठी तो मोस्ट वॉन्टेंड गुन्हेगार होता. आठ महिन्यात त्याने चॉकलेट गँग तयार केली आणि कामशेत मधील एका व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण केले. त्यामुळे या गँगचे कारनामे पहिल्यांदाच उघड झाले. या गँगच्या 9 गुंडांना मोक्का अंतर्गत अटक केल्याची माहिती पोलीस निरिक्षक पद्माकर घनवट यांनी दिलीय.

Loading...

धक्कादायक : दुष्काळामुळे मराठवाड्यातून मुंबईत आलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

पुणे जिल्ह्यात ग्रामीण आणि शहर अशा दोनही भागात अनेक गँग कार्यरत आहेत. शहर आणि ग्रामीण मधले अनेक गुन्हेगार सध्या तडीपार आहेत आणि काही मोका अंतर्गत शिक्षा भोगत आहेत. असं असूनही या गुंडांचा धुमाकूळ आणि त्रास काही कमी होत नाही. गुन्हेगारांचा हा मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 29, 2019 09:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...