नाशिकमधला द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत

द्राक्षाचं उत्पादन खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. कर्ज माफीसह हमी भाव मिळाला तरंच शेतकरी वाचेल अशी भावना आहे या शेतकऱ्यांची.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 15, 2017 07:04 PM IST

नाशिकमधला द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत

प्रशांत बाग, 15 एप्रिल : निसर्गाचं वरदान लाभलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकरी तसा सुखी मानला जायचा.मुबलक पाणी,देशातील बाजारपेठांशी कनेक्टिव्हिटी,एक्स्पोर्ट होणारा कांदा आणि द्राक्ष. पण या जिल्ह्यातील शेतकऱ्याला सध्या चांगलंच ग्रहण लागलंय. अवकाळी पाऊस,गारपीट यानं फटका बसलेले द्राक्ष मळे, ओलाइनं खराब होत असलेला कांदा, यात सतत होणाऱ्या नुकसानीनं शेतकरी पार जेरीस आलाय. यंदा तर द्राक्षाचं उत्पादन खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. कर्ज माफीसह हमी भाव मिळाला तरंच शेतकरी वाचेल अशी भावना आहे या शेतकऱ्यांची.

द्राक्ष पिकाला अनुकूल वातावरण असल्यानं देशात सर्वाधिक द्राक्षाचं उत्पादन नाशिक जिल्ह्यात घेतले जात.मात्र गेल्या चार पाच वर्षापासून अवकाळी पाऊस,गारपीट,आणि दुष्काळा मुळे द्राक्ष उत्पादन शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला होता.या वर्षी चांगलं उत्पादन झालं खरं पण बाजारपेठेनं शेतकऱ्याला दगा दिला.

दर वर्षी नाशिक जिल्ह्यातून जवळपास दीड लाख मॅट्रिक टन द्राक्ष आंतराष्ट्रीय बाजार पेठेत निर्यात केली जाते. तर देशांतर्गत जवळपास 20 ते 22 लाख मॅट्रिक टन द्राक्षं पाठवली जातात. मात्र या वर्षी युरोपमध्ये चिली देशातून चांगल्या प्रतीची जास्त द्राक्ष आल्यानं साहजिक भारतीय द्राक्षाला उठाव राहिला नाहीय.आज एक्स्पोर्ट क्वालिटीचे द्राक्षाचं उत्पादन घेण्यासाठी जवळपास एकरी 3 लाख रुपये खर्च येत असल्यानं या वर्षी मात्र शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघाला नाहीय.

या वर्षी भारतीय बाजारपेठेतील द्राक्षला 16 रुपये तर एक्स्पोर्टच्या द्राक्षाला 35 रुपये इतका कमी भाव मिळत आहे.देशात द्राक्ष उत्पादनाच्या 6 टक्के इतकाच माल निर्यात केला जातोय..मात्र सरकारने देशांतर्गत बाजार पेठेला चालना दिली. एक तर बाजारपेठपर्यंत विक्रीला माल नेण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च तर दुसरीकडे अडते आणि व्यापाऱ्यांच्या साखळीत पिचलेला शेतकरी ही परिस्थिती आहे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची.हमीभाव देणं शक्य नसेल तर उत्पादन खर्च तरी नियंत्रणात आणावा एव्हढीच अपेक्षा आहे शेतकऱ्यांची.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2017 07:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...