नाशकात देव दीनासाठी धावला, डॉ. सुहास कोटक यांच्या तत्परतेमुळे बचावला तरुण

नाशिकच्या पंचवटीतील अमृतधाम इथं रात्री अपघात झाल्यानंतर गंभीर अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीवर थेट रस्त्यातच उपचार करण्यात आले.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 27, 2017 03:30 PM IST

नाशकात देव दीनासाठी धावला, डॉ. सुहास कोटक यांच्या तत्परतेमुळे बचावला तरुण

27 डिसेंबर: एरवी एखादा अपघात झाला तर बघ्यांची गर्दी होते. गर्दी झाल्यानंतर मदत कार्य करण्यास अडथळा निर्माण होतो परिणामी अपघात गंभीर असल्यास अपघातग्रस्त व्यक्ती मृत पावते. मात्र नाशिकच्या पंचवटीतील अमृतधाम इथं रात्री अपघात झाल्यानंतर गंभीर अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीवर थेट रस्त्यातच उपचार करण्यात आले.

पंचवटीच्या अमृतधाम चौफुलीवर दोन मोटारसायकलचा अपघात झाला. या अपघातात एकाच्या तोंडाला आणि डोक्याला जबर मार लागला. हा अपघात झाला, त्याच वेळी कळवणचे डॉक्टर सुहास कोटक हे रस्त्यानं जात असताना त्यांनी गाडी थांबवत त्वरित जखमींवर उपचार सुरू केले. रुग्णवाहिका येईपर्यंत अर्धा तास निघून गेला होता.अपघातात जखमींच्या तोंडातून रक्तस्त्राव होत असल्यानं त्याला ऑक्सिजनची गरज होती. डॉ सुहास कोटक यांनी आपल्या गाडीत असलेला ऑक्सिजन पंप काढून जखमींवर अपघातस्थळी रस्त्यावरच सुरू उपचार केले.

दरम्यान सुहास कोटक यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे प्राण वाचले. त्यामुळे डॉक्टर कोटक यांचं सर्वत्र कौतुक होतंय. डॉक्टर कोटक यांनी जखमींवर उपचार केले नसते तर त्याला मृत्यूशी झुंज द्यावी लागली असती. विशेष म्हणजे या ठिकाणी आडगाव पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असतानाही फोन करूनही तिथला एकही कर्मचारी या ठिकाणी आला नाही. मात्र याच वेळी पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डे हे घटनास्थळी पोहोचले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2017 03:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...