S M L

'नीट'चा गोंधळ, जवळपास 200 विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला

Samruddha Bhambure | Updated On: May 7, 2017 12:50 PM IST

'नीट'चा गोंधळ, जवळपास 200 विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला

07 मे : नाशिकमध्ये नीट परीक्षेदरम्यान एका केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर चूकीचा पत्ता छापल्यामुळे जवळपास 150 ते 200 विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलं आहे.

नाशिकच्या आरटीओ कॉर्नर परिसरातील एकलव्य स्कूलमध्ये ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा होती, त्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर मुंडेगावच्या एकलव्य स्कूलचा पत्ता होता. ऐनवेळी झालेल्या या गोंधळामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

नीट प्रशासनाच्या या निष्काळीपणाचा जवळपास 200 विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2017 12:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close