News18 Lokmat

झोक्याच्या दोऱ्याचा फास लागून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

घरात बाळासाठी बांधण्यात आलेल्या झोक्याचा फास लागून बारा वर्षीय मुलाचा मृत्यु झाल्याची धक्कादाक घटना घडली आहे. नाशिकच्या हरसूल भागात ही घटना घडली आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Mar 5, 2018 02:48 PM IST

झोक्याच्या दोऱ्याचा फास लागून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

05 मार्च : घरात बाळासाठी बांधण्यात आलेल्या झोक्याचा फास लागून बारा वर्षीय मुलाचा मृत्यु झाल्याची धक्कादाक घटना घडली आहे. नाशिकच्या हरसूल भागात ही घटना घडली आहे. या घटनेत उमेश कुवर या 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

उमेशला खेळण्यासाठी त्याच्या घरात पाळणा बांधण्यात आला होता. झोक्यावर खेळत असताना अचानक त्याचा तोल गेला. आणि झोक्याच्या नायलॉन दोरीचा त्याला गळ्याला फास बसला. या घटनेनंतर उमेश बेशुद्ध पडला. त्याच्या चुलत भावाने हा प्रकार पाहिला असता त्याला तात्काळ शासकीय रुग्णायलात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

लहान मुलांना खेळण्यासाठी अनेकांच्या घरीच काय तर उद्यानातही झोके बांधलेले असतात. मस्ती करत लहान मुलं त्याच्यावर वेडेवाकडे खेळतात. पण अशात पालकांनी त्यांच्यावर लक्ष देणं महत्त्वाचं आहे. या घटनेमुळे हरसूल गावात हळहळ व्यक्त होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 5, 2018 02:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...