रामटेकमध्ये शेतकरी आत्महत्येचा देखावा बेतला जीवावर,उपाशी राहिल्यानं गेला जीव

नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक इथं त्रिपुरारी पौर्णिमेला आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत शेतकरी आत्महत्येचा देखावा सादर करणाऱ्या एका कलावंताचा आकस्मिक मृत्यू झालाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 5, 2017 02:15 PM IST

रामटेकमध्ये शेतकरी आत्महत्येचा देखावा बेतला जीवावर,उपाशी राहिल्यानं गेला जीव

नागपूर, 05 नोव्हेंबर : नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक इथं त्रिपुरारी पौर्णिमेला आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत शेतकरी आत्महत्येचा देखावा सादर करणाऱ्या एका कलावंताचा आकस्मिक मृत्यू झालाय. त्यामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जातेय. मनोज धुर्वे असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाचा मृत्यू गळफास लागून झाला नाही असं पोस्ट मॉर्टेमच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट झालंय. या शोभायात्रेत मृत्यू झाल्याचं फार उशिरा कळलं. त्याचा प्राण गेल्यावरही शोभायात्रा सुरू होती.

मनोजचा मृत्यू उपाशी राहिल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे झाला असल्याची शक्यता वर्तवलीय.  व्हिसेरा रिपोर्टनंतर हे स्पष्ट होणाराय. रामटेकमध्ये दरवर्षी अशा प्रकारे शोभायात्रा आयोजित केली जाते. या वर्षी शेतकरी प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी तीन चित्ररथ आयोजित करण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2017 02:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...