09 जुलै : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील १४ मैल इथे वेणा धरणात बोट बुडाली. बोटीत ११ लोक बसले असताना बोट उलटली. आतापर्यंत एकाचा मृतदेह सापडला आहे. मृतकचे नाव राहुल जाधव आहे.
सुमारे साडे सात वाजताची ही घटना. या बोटीत विद्यार्थी होते. सहलीसाठी नागपूरचे विद्यार्थी गेले होते. त्यापैकी 3 जिवंत बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलंय. यात अतुल बावने, रोशन दोडके, अमोल दोडके यांचा समावेश आहे.
उर्वरित 7 लोक बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांचा तापस युद्धपातळीवर सुरू आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा