S M L
Football World Cup 2018

शहरांमधला कचराप्रश्न अजूनही पेटलेलाच!

राज्यातल्या प्रमुख शहरांमधल्या कचऱ्याचा प्रश्न काही केल्या मिटत नाहीये, औरंगाबादमध्ये तर २३ दिवसानंतरही शहरातला कचरा बाहेर काढता आलेला नाही

Sonali Deshpande | Updated On: Mar 13, 2018 05:07 PM IST

शहरांमधला कचराप्रश्न अजूनही पेटलेलाच!

13 मार्च : राज्यातल्या प्रमुख शहरांमधल्या कचऱ्याचा प्रश्न काही केल्या मिटत नाहीये, औरंगाबादमध्ये तर २३ दिवसानंतरही शहरातला कचरा बाहेर काढता आलेला नाही, कारण कचरा टाकण्यासाठी आजूबाजूच्या गावांचा तीव्र विरोध सुरू आहे. त्यामुळे शहरांमध्ये अजूनही कचऱ्याचे ढीग कायम आहेत.

तिकडे कल्याण आणि दिव्यामध्ये तर गेल्या ५ दिवसांपासून कचरा डेपोला लागलेली आग अजूनही धुमसतेच आहे. त्यामुळे शहरावर धुराचं साम्राज्य पसरलंय. नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलंय. पिंपरी चिंचवडमध्ये तर चक्क कचरा टेंडरमध्येच भ्रष्टाचार झाल्याचं उघडकीस आलंय. त्यामुळे कचऱ्यासारख्या महत्त्वाच्या नागरीसमस्येवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी किती गंभीर आहेत हेच स्पष्ट होतंय.

अशात आता राज्य सरकारनेच कोणत्याही महापालिकांना कचरा डेपोसाठी जागा देण्यास स्पष्ट नकार दिलाय त्यामुळे दिवसेंदिवस महानगरांमधला हा कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न आणखीनच गंभीर स्वरूप धारण करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 13, 2018 05:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close