कुंडलिका नदीपात्रात चित्तथरारक बचावकार्य, 55 तरुण सुखरूप

अखेरीस या 55 तरूणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. हे सर्वजण मुंबईतल्या पोद्दार, केळकर आणि एच.आर कॉलेजचे विद्यार्थी असल्याचं समजतंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 26, 2017 09:55 AM IST

कुंडलिका नदीपात्रात चित्तथरारक बचावकार्य, 55 तरुण सुखरूप

26 जून : मुंबईतून वर्षासहलीसाठी आलेल्या पर्यटक नदीपात्रापलिकडे अडकल्याने त्यांना वाचवण्यासाठी एक चित्तथरारक बचावकार्य रायगडमधील कुंडलिका नदीपात्रात पार पडलं.वर्षासहलीसाठी देवकुंड परिसरातील धबधब्याखाली हे तरूण भिजण्यासाठी आले होते. काल रात्रीपासून रायगडमध्ये पाऊस पडत होता. दुपारनंतर पावसाचा जोर कमालीचा वाढला. त्यामुळे सकाळी धबधब्यावर भिजण्यासाठी आलेले काहीजण तिथेच अडकून पडले.

अखेर ही बाब माणगाव पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी विरेंद्र जाधव यांच्या रिव्हर राफ्टिंग पथकाला घटनास्थळी बोलावलं. त्यानंतर तब्बल 2 तास कुंडलिका नदीवर हे रेस्क्यू ऑपरेशन झालं. अखेरीस या 55 तरूणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. हे सर्वजण मुंबईतल्या पोद्दार, केळकर आणि एच.आर कॉलेजचे विद्यार्थी असल्याचं समजतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2017 09:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close