S M L

कोरेगाव भीमा हिंसेचे नक्षल कनेक्शन शोधण्यासाठी मुंबई, पुणे, हैद्राबादमध्ये छापासत्र

कोरेगाव भीमा दंगलीचं नक्षल कनेक्शन शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी आज मुंबई, ठाणे आणि हैदराबादमध्ये ठिकठिकाणी छापे टाकलेत.

Updated On: Aug 28, 2018 12:14 PM IST

कोरेगाव भीमा हिंसेचे नक्षल कनेक्शन शोधण्यासाठी मुंबई, पुणे, हैद्राबादमध्ये छापासत्र

मुंबई, 28 ऑगस्ट : कोरेगाव भीमा दंगलीचं नक्षल कनेक्शन शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी आज मुंबई, ठाणे आणि हैदराबादमध्ये ठिकठिकाणी छापे टाकलेत. अरुण फरेरा, सुशान अब्राहम यांच्या घरावर हे छापे टाकण्यात आलेत. एल्गार परिषदेच्या आयोजनातील नक्षली सहभागाच्या संशयावरुन संबंधीतांच्या घराची पुणे पोलिसांकडून झडती सुरू आहे. हैदराबाद, मुंबई, दिल्ली, हरियाणा, रांची या शहरांमध्ये हे छापासत्रं सुरू आहेय.

गोवा, हरियाणा, तेलंगणा, मुंबई, छत्तीसगढ अश्या मिळून पाच ठिकाणी एल्गार परिषदेच्या आयोजनसंदर्भातल्या उघड झालेल्या नक्षलवादी लिंकनंतर आता त्यासाठी पूरक भूमिका घेऊन काम कारणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी आज सकाळपासून धाडी टाकल्यात. पुणे वरवरा राव, वरणोन गोंसलविस, अरुण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलाखा यांच्याकडे धाडी टाकण्यास सुरूवात करण्यात आली.

काय आहे भीमा-कोरेगाव प्रकरण?

भीमा-कोरेगावमध्ये 1 जानेवारीला किरकोळ वादातून दोन गटांमध्ये मोठा वाद झाला होता. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली होती. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे रुपांतर दगडफेक आणि जाळपोळीत झालं. भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये हा वाद उफाळला होता.

सणसवाडीत हा वाद शिगेला पोहचला होता. तिथे अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली.  दगडफेकीत पोलिसांसह अनेक जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद मराठवाड्यातही उमटले होते.

Loading...
Loading...

मुंबईतही हिंसक पडसाद

भीमा कोरेगाव प्रकरणाचे मुंबईमध्येही हिंसक पडसाद उमटले आहेत. कुर्ला, मुलुंड आणि चेंबूर परिसरात निषेधार्थ मोर्चादरम्यान वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. मुलुंडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. स्टेशन रोड परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 

बैलगाडी शर्यतीत आला पहिला, अतिउत्साहात गाडीतून गेला तोल, आणि...! VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2018 12:06 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close