कोपर्डी बलात्कार आणि खून खटल्यात तिन्ही आरोपी दोषी सिद्ध, 21 नोव्हेंबरला सुनावणार शिक्षा

जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिन्ही आरोपींना कोर्टानं दोषी सिद्ध केलंय.

Sonali Deshpande | Updated On: Nov 18, 2017 12:39 PM IST

कोपर्डी बलात्कार आणि खून खटल्यात तिन्ही आरोपी दोषी सिद्ध, 21 नोव्हेंबरला सुनावणार शिक्षा

18 नोव्हेंबर : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी खून आणि बलात्कार प्रकरणात तिन्ही आरोपींना कोर्टानं दोषी ठरवलंय. 21 नोव्हेंबर म्हणजे मंगळवारी त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिन्ही आरोपींना कोर्टानं दोषी सिद्ध केलंय.

बलात्कार, खून, गुन्हेगारी कट रचणे आणि अन्य गुन्हे सिद्ध झाले आहेत. या खटल्यात वैद्यकीय पुरावे महत्वाचे ठरले, असा निर्वाळा कोर्टानं दिला. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या खटल्यात सरकारची बाजू मांडली. 13 जुलै 2016 रोजी नगरच्या कोपर्डी गावात नववीत शिकणाऱ्या मुलीवर तिन्ही दोषींनी बलात्कार केला, त्यानंतर अतिशय निर्घृण पद्धतीनं तिच्यावर शारीरिक अत्याचार झाले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.

या खटल्यात सरकारी पक्षाकडून 31 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आलीय. या खटल्यात आरोपींच्या वतीने अंतिम युक्तिवाद पूर्ण झालाय. तिन्ही आरोपींच्या वतीनं कोर्टात लेखी युक्तिवाद दाखल करण्यात आलाय.

कोपर्डीचा घटनाक्रम

- 13 जुलै 2016 - नववीत शिकणाऱ्या मुलीची बलात्कार करून निर्घृण हत्या

- 14 जुलै 2016 - गावातील आरोपी जितेंद्र शिंदेला अटक

- 16 जुलै 2016 - संतोष भवाळ, नितीन भैलुमेला अटक

- 7 ऑक्टो. 2016 - न्यायालयात आरोपपत्र दाखल

- 20 डिसें. 2016 - पहिला साक्षीदार तपासला

- 24 मे 2017 - शेवटचा साक्षीदार तपासला

- 4 सप्टें. 2017 - बचाव पक्षाकडून एक साक्षीदार नोंदवला

- 26 ऑक्टो. 2017 - अंतिम युक्तिवादाला सुरुवात

- 8 नोव्हें. 2017 - अंतिम युक्तिवाद पूर्ण

- 18 नोव्हेंबर - तिन्ही आरोपी दोषी, शिक्षा 21 नोव्हेंबर रोजी

पाहूयात नेमके कोणते गुन्हे कोर्टात सिद्ध झाले..

- कलम 302 - खून

- कलम 376 - बलात्कार

- कलम 120 (ब) - गुन्हेगारी कट रचणे

- कलम 109 - गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणे

- कलम 354 - छेडछाड

- पॉस्को कायद्याअंतर्गत 3 कलमं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 18, 2017 09:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close