नदीच्या पात्रात आई-वडील बेपत्ता, मुलगी सुखरूप

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कळे गावाजवळील कुंभी नदीच्या पात्रात श्रीकांत धोंडी कांबळे (वय ३९, रा. पणुत्रे, ता. पन्हाळा) आणि लता (वय ३४) हे दाम्पत्य रविवारी बेपत्ता झाले आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2017 07:23 PM IST

नदीच्या पात्रात आई-वडील बेपत्ता, मुलगी सुखरूप

संदीप राजगोळकर, 16 जुलै : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कळे गावाजवळील कुंभी नदीच्या पात्रात श्रीकांत धोंडी कांबळे (वय ३९, रा. पणुत्रे, ता. पन्हाळा) आणि लता (वय ३४) हे दाम्पत्य रविवारी बेपत्ता झाले आहे. यासंदर्भात कळे पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

आपली पाच वर्षांची मुलगी उत्कर्षा आजारी असल्यामुळे पणुत्रे येथून कळे येथील रुग्णालयात तिला दाखविण्यासाठी घेऊन जातो, असे नातेवाईकांना सांगून श्रीकांत आणि लता हे रविवारी सकाळी दुचाकीवरून (एमएच 0९ ए एफ ६६0४) बाहेर पडले होते. १0. ३0 वाजण्याच्या सुमारास कुंभी नदीवरील गोठे बंधाऱ्यावर पाच वर्षाची मुलगी उत्कर्षा धरणावर रडत बसल्याचे या बंधाऱ्यावरुन ये-जा करणाऱ्यांच्या लक्षात ही घटना आली. त्यांनी चौकशी केली असता आई-वडिलांनी नदीत उडी मारल्याचे समजले.

 

याबाबत तत्काळ पोलिस पाटील यांना कळविण्यात आले. यानंतर तत्काळ कळे पोलिसांचे पथक घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी श्रीकांत यांच्या वडिलांशी संपर्क साधून बोलावून घेतले आणि घाबरलेल्या मुलीला त्यांच्या ताब्यात दिले आहे. मात्र अजूनही या दांपत्याचा शोध पोलीस, व्हाईट आर्मी आणि जिल्हा प्रशासन यांच्या कडून कुंभी नदी पात्रात सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2017 07:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...