पुनर्वसन झालेल्या माळीणची पहिल्याच पावसात बिकट अवस्था

गावातील अनेक रस्ते खचले आहेत. तर भिंतींनाही मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ नाराज आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 25, 2017 04:07 PM IST

पुनर्वसन झालेल्या माळीणची पहिल्याच पावसात बिकट अवस्था

25 जून : पुनर्वसन झालेल्या माळीणची पहिल्या पावसात बिकट अवस्था झाली आहे. गावातील अनेक रस्ते खचले आहेत. तर भिंतींनाही मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ नाराज आहे.

माळीण गावावर 30 जुलै 2014 रोजी दरड कोसळल्यानं संपूर्ण गाव मातीखाली गाडलं गेलं होतं. या दुर्घटनेनंतर राज्य सरकारनं 2 एप्रिल रोजी माळीण गावच्या पुनर्वसनाच्या कामाचं उद्घाटन केलं. यावेळी माळीण गावातील नव्यानं बांधण्यात आलेल्या घरं, शाळा आणि मंदिरांचं बांधकामांचं लोकार्पण करण्यात आलं.

दरम्यान 20 अधिकाऱ्यांच्या टीम कडून पाहणी करण्यात येणार असल्याचं पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलंय.कंत्राटदाराने एक वर्षाची गॅरंटी घेतली असल्याने ते पुन्हा दुरुस्त करणार येईल.इंजीनिअरिंग कॉलेजच्या 20 जणांची टीम उद्या माळीण गावाला भेट देणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2017 04:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...