निषेध कसला करताय?जा, घुसा आणि दहशतवाद्यांना गोळ्या घाला - उद्धव ठाकरे

निषेध कसला करताय?जा, घुसा आणि दहशतवाद्यांना गोळ्या घाला - उद्धव ठाकरे

धुळ्यातील शेतकरी संवाद सभेत सत्ताधारी भाजप आणि विरोधकांवर उद्धव ठाकरेंनी चौफेर टीका केली.

  • Share this:

धुळे, 13 जुलै : अमरनाथ यात्रेत जाणाऱ्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर हिंदुस्थानवर हल्ले होत असताना निषेध कसला करताय, जा घुसा आणि दहशतवाद्यांना गोळ्या घाला, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिलं. धुळ्यातील शेतकरी संवाद सभेत सत्ताधारी भाजप आणि विरोधकांवर उद्धव ठाकरेंनी चौफेर टीका केली.

मोदी  मन कि बात करतात मात्र मी शेतकऱ्यांच्या मन कि बात सांगत असून हे हिंदू राष्ट्र असताना अमरनाथ यात्रेवर हल्ला होतोच कसा असा प्रश्न ठाकरे यांनी यावेळी केला. विरोधक शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यात अपयशी ठरल्यामुळेच शिवसेना रस्त्यावर उतरली असल्याचं सांगत अजित पवारांच्या गांडूळाच्या दुतोंडी उपमेलाही ठाकरे यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं. गांडूळ तरी शेतकऱ्यांचा मित्र आहे, आपण काय कामाचे असं म्हणत अजित पवारांचा समाचार घेतला.

विखे कुटुंब शिवसेनेचे उपकार विसरले असं ठाकरे यांनी सांगत आधी विखेंनी सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणं सोडावं मग टीका करावी असं आवाहन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2017 02:32 PM IST

ताज्या बातम्या