S M L

लातूर-बीडमधून भाजपचे सुरेश धस 78 मतांनी विजयी, जगदाळे पराभूत

उस्मानाबाद बीड लातूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे सुरेश धस विजयी तर राष्ट्रवादी पुरस्कृत अशोक जगदाळे पराभूत झाले. भाजपचे धस 78 मतांनी विजयी झाले.

Sonali Deshpande | Updated On: Jun 12, 2018 10:43 AM IST

लातूर-बीडमधून भाजपचे सुरेश धस 78 मतांनी विजयी, जगदाळे पराभूत

औरंगाबाद, 12 जून : उस्मानाबाद बीड लातूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे सुरेश धस विजयी तर राष्ट्रवादी पुरस्कृत अशोक जगदाळे पराभूत झाले. भाजपचे धस 78 मतांनी विजयी झाले. त्यामुळे धनंजय मुंडेंना धक्का बसला.

आज सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली . मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये विधानपरिषद निकालाच्या अनुषंगाने 5 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

औरंगाबाद खंडपीठाने यातील एक याचिका फेटाळत चार याचिका निकाली काढल्या. तसंच या विधानपरिषदेची मतमोजणी तत्काळ करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय राज्यमंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या 10 नगरसेवकांची मते एकत्रित करुन मोजणी करावी असे आदेश खंडपीठाने दिले होते.

निवडणुकीतले महत्त्वाचे मुद्दे

- मुंडे विरुद्ध मुंडे अशी प्रतिष्ठेची लढाई

Loading...
Loading...

- रमेश कराडांच्या माघारीनं राष्ट्रवादीवर अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची नामुष्की

- राष्ट्रवादीच्या बंडखोर 6 सदस्यांना मिळाला मतदानाचा अधिकार

- काकू-नाना आघाडीच्या 9 नगरसेवकांसह इतर दोन अपात्र नगरसेवकांना दणका

- बीडमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजपला साथ

- शिवसेनेनं कुठलीही भूमिका न घेतल्याचा भाजपला फटका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 12, 2018 10:37 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close