S M L

पुणे दिवाणी कोर्टात पहिल्यांदाच 'स्काईप'द्वारे मिळाला घटस्फोट

घटस्फोट हवा असेल तर खूप मोठ्या प्रक्रियेला सामोरं जावं लागतं. अनेक वेळा कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. मात्र आता पुणे दिवाणी न्यायालयानं ही जुनी परंपरा मोडीत काढलीये.

Sachin Salve | Updated On: May 2, 2017 05:33 PM IST

पुणे दिवाणी कोर्टात पहिल्यांदाच 'स्काईप'द्वारे मिळाला घटस्फोट

02 मे : घटस्फोट हवा असेल तर खूप मोठ्या प्रक्रियेला सामोरं जावं लागतं. अनेक वेळा कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. मात्र आता पुणे दिवाणी न्यायालयानं ही जुनी परंपरा मोडीत काढलीये. कारण एका दाम्पत्यानं घटस्फोटासाठी अर्ज केला होता आणि या घटस्फोटाची सुनावणी कोर्टानं चक्क ऑनलाईन घेतलीये.

या दाम्पत्याने एकमेकांच्या सहमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. शनिवारी पती सुनावणीला हजर राहण्यासाठी सिंगापूरहून भारतात आला. मात्र, वैयक्तिक कारणांमुळे पत्नीला लंडनहुन येणे शक्य नव्हते. या वेळी न्यायालयाने जुन्या परंपरेप्रमाणे पुढची तारीख न देता, नेहमीपेक्षा वेगळा निर्णय देत, स्काईपवरून आपली बाजू मांडण्याची परवनागी या महिलेला दिली.

या दाम्पत्याने प्रेमविवाह केला होता. एकाच कॉलेजमध्ये शिकत असताना दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. त्या वेळी त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

दोघांनी २०१६मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला. यानंतर महिला लंडनला निघून गेली. वकिलाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी व्हावी, अशी विनंती केली असता, न्यायालयाने ती मान्य केली.

पती न्यायालयात उपस्थित असताना, पत्नी स्काईपच्या माध्यमातून आपली बाजू मांडत होती. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने हा घटस्फोट मंजूर केला. अशा पद्धतीनं 'स्काईप'च्या माध्यमातून घटस्फोट होण्याची ही पहिलीच घटना आहे.

करिअरसाठी घटस्फोट

२०१५मध्ये अमरावती येथे लग्न केल्यानंतर, दोघेही पुण्याला आले. हिंजवडीत वेगवेगळ्या कंपनीत दोघेही कामाला होते. महिन्याभरानंतर दोघांनाही परदेशी जाण्याची संधी मिळाली.

पतीला सिंगापूर तर पत्नीला लंडनमध्ये जाण्याची संधी मिळाली. पती सिंगापूरला निघून गेला. मात्र, पत्नीला येथेच थांबावे लागले. आपले लग्न करिअरच्या मार्गात अडथळा ठरू लागल्याचे तिने अर्जात म्हटलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2017 05:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close