News18 Lokmat

मराठा आरक्षण तर जाहीर झालं, पण त्यानंतर घडल्या या 5 महत्त्वाच्या गोष्टी

राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण जाहीर केलं. पण त्यानंतर पाच मोठ्या घडल्या आहेत. जाणून घेऊयात कोणत्या आहेत या घडामोडी...

News18 Lokmat | Updated On: Dec 3, 2018 05:25 PM IST

मराठा आरक्षण तर जाहीर झालं, पण त्यानंतर घडल्या या 5 महत्त्वाच्या गोष्टी

दोन्ही सभागृहात विधेयक संमत करत राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण जाहीर केलं. पण त्यानंतर पाच मोठ्या घडल्या आहेत. जाणून घेऊयात कोणत्या आहेत या घडामोडी...

मराठा आरक्षणाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्य सरकारने 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण जाहीर करणं हे राज्यघटनेविरोधात आहे, अशी भूमिका घेत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या वतीनं ही याचिका सादर करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात कॅव्हिएट दाखल केलं आहे. राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर या आरक्षणाविरोधात काही लोक कोर्टात जाण्याची शक्यता आहे. हीच शक्यता लक्षात घेऊन मराठा आरक्षण टिकावं, यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचललं आहे.

Loading...

मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलं आहे. त्यामुळे आरक्षणाविरोधातील याचिकेवर निर्णय देण्या आधी कोर्टाला विनोद पाटील यांचंही म्हणणं ऐकून घ्यावं लागेल.

मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर आधीपासूनच आरक्षणाची मागणी करत असलेला धनगर समाजही आक्रमक झाला आहे. सरकारने लवकरात लवकर आमच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी करत धनगर समाजाने मनमाडमध्ये एका मेळाव्याचं आयोजन केलं होतं.

आमच्या समाजाचं सर्वेक्षण करण्यात यावं, अशी मागणी ब्राह्मण समाजानेही सरकारकडे केली आहे. ही मागणी आम्ही मागासवर्ग आयोगाकडे पाठवण्यात येईल, असं आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 3, 2018 05:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...